Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या कार्यालयात चंदन चोरट्यांचा डल्ला

पुण्यात विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांच्या कार्यालयात चंदन चोरट्यांचा डल्ला

डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरात चंदन चोरांचा उच्छाद सुरू असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. लॉ- कॉलेज रोडवरील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयाच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाची दोन झाडे कापून नेली आहेत. सोमवारी (दि. १९) पहाटे हा प्रकार घडला असून, घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऍड. असीम सरोदे यांनी तक्रार दिली आहे.

अपघातानंतर तरुणाला बोनेटवरून फरफटत नेले – सविस्तर  बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, असीम सरोदे यांचे लॉ कॉलेज रोडवर ऑफिस आहे. त्यांच्या ऑफिस परिसरात दोन मोठे चंदनाची झाडी होती. सोमवारी चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास कटरचा वापर करून झाडे तोडून ओंडके चोरून नेले. पहाटेच्या शांत वेळेचा फायदा घेत ही चोरी केली आहे.

हेरगिरीकरून चदनांची झाडे कापून चोरली जात आहेत. खाजगी मालमत्ता तसेच शासकीय मालमत्ता येथून चोऱ्या होत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी प्रभात रस्त्यावर इमारतीत शिरून चंदन चोरणाऱ्या चोरट्यांमध्ये व गस्तीवरील पोलिसांत थरार घडला होता. चोरट्याला पकडताना त्याने पोलिसांवर कोयता उगारला होता. तेव्हा पोलिसांनी स्वरक्षणर्थ गोळीबार केला होता. त्यात चोरट्याच्या पायाला गोळी लागली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×