सिंहगड रस्ता परिसरातील घटना, १ तोळ्याची चैन चोरली
Marathinews24.com
पुणे – लघुशंका करण्यासाठी थांबलेला तरूणाला दोघाजणांनी बाचाबाची करीत लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी संबंधित तरूणाला आम्ही येथे साफसफाई करतो, तु इथे का लघवीला थांबला आहे, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का अशी विचारणा करीत त्याच्याजवळ येउन ५० हजारांची सोनसाखळी चोरून नेली आहे. ही घटना १९ एप्रिलला रात्री सव्वा नउच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्दमधील आनंदविहार सोसायटीजवळ घडली आहे. याप्रकरणी निखील खंडागळे (वय २२, रा. आंबेगाव पठार ) याने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
शुश्रृषेसाठी ठेवलेल्या कामगाराने ज्येष्ठाची १४ लाखांची केली फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार निखील हे आंबेगाव पठार परिसरात राहायला असून, १९ एप्रिलला रात्री सव्वा नउच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्दमधील आनंदविहार सोसायटीजवळ मोकळ्या मैदानात लघुशंका करण्यासाठी थांबले होते. त्यावेळी परिसरात असलेल्या दोघांनी त्याला अडविले. आम्ही येथे साफसफाई करतो, तु इथे का लघवीला थांबला आहे, अशी विचारणा करीत रस्ता का तुझ्या बापाचा आहे का असे विचारले. त्याच्याजवळ येउन चोरट्यांनी निखीलसोबत झटापट केली. त्याच्या गळ्यातील १० ग्रॅम किंमतीची ५० हजारांची हिसकावून नेली. निखीलने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले आहेत. याप्रकरणी पोलीस अमलदार तारू तपास करीत आहेत.