Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यात तुषार दामगुडेंविरुद्ध गुन्हा दाखल

काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार मारहाण प्रकरण

marathinews24.com

पुणे – काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण करुन त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविल्याप्रकरणी तुषार दामगुडे यांच्यासह साथीदारांविरुद्ध स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत हनुमंत दिगंबर पवार (वय ४१, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषीकेश परदेशी, अभिमन्यू मैड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामगुडे आणि पवार हे सोमवारी सायंकाळी एका वृत्तवाहिनीच्या वार्तालाप कार्यक्रमात सहभागी झाले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास वार्तालाप कार्यक्रम संपल्यानंतर दामगुडे आणि पवार हे मित्रमंडळ चौकातील पदपथावर थांबले. त्यावेळी दामगुडे आणि पवार यांच्यात बाचाबाची झाली. ‘तू भारतीय जनता पक्षाच्या विरोधात बोलतो. तुला हर्षवर्धन सपकाळ यांचा एवढा पुळका का आहे. पुण्यात राहायचे असेल, तर नीट रहा, ’ अशी धमकी दामगुडे यांनी पवार यांना दिली. त्यानंतर दामगुडे यांनी त्यांच्याकडील पिस्तूल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. दामगुडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी पवार यांना मारहाण केली, असे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पवार यांना माराहाण केल्याचा प्रकार टिपला. त्यानंतर पवार हे स्वारगेट पोलीस ठाण्यात गेले. त्यांनी दामगुडे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×