Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण

मोटार चालकाकडून पीएमपी चालकाला मारहाण

भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली घटना

marathinews24.com

पुणे – प्रेमप्रकरणाच्या संशयावरुन तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. अमन सुभाष मोरे (वय २६, सध्या रा. दत्तवाडी, मूळ रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अल्तमश नासीर शेख (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याला अटक केली आहे. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अटकेच्या भीतीने मसाज पार्लरमधील महिलेने उडी मारली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमनचे एका तरुणीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय शेख याला होता. अमन आणि त्याची मैत्रीण हे २३ फेब्रुवारी रोजी सिंहगडावर फिरायाल निघाले होते. अमनच्या मैत्रिणीचे डोके दुखत असल्याने ते एका ओैषध विक्री दुकानात गेले. डोके दुखीवर त्यांनी गोळ्या घेतल्या. त्यानंतर आरोपी शेख आणि आठ ते दहा साथीदार तेथे आले. ‘तू कोठे चालला आहे. आमच्या मुलीसोबत मैत्री करायची. तुझी लायकी आहे का’, अशी विचारणा करुन अमनला दुचाकीवरुन भवानी पेठेतील कासेवाडी परिसरात नेले. तेथील एका इमारतीच्या तळमजल्यावर अमनला गजाने बेदम मारहाण केली.

जखमी अवस्थेतील अमनला महात्मा फुले स्मारक परिसरात सोडून आरोपी शेख आणि साथीदार पसार झाले. जखमी अवस्थेतील अमनने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रात्री उशीरा आरोपी शेख याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×