Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

अटकेच्या भीतीने मसाज पार्लरमधील महिलेने उडी मारली

महिलेचा मृत्यू; व्यवस्थापक गंभीर जखमी

marathinews24.com

पुणे – शहरातील विमाननगर भागात मसाज पार्लरवर कारवाई सुरू असताना अटकेची भीती वाटल्याने पार्लरमधील महिलेसह व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून पार्लरमधील व्यवस्थापक जखमी झाला. विमानतळ पोलीस ठाण्याच्या पथकाने दुपारी तीनच्या सुमारास मसाज पार्लरवर छापा टाकला होता. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याने घटनेत महिलेसह व्यवस्थापक गंभीर जखमी झाले. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती विमानतळ पाेलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले – सविस्तर बातमी

मृत्युमुखी पडलेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सूरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात मसाज पार्लरमधील अन्य महिला, तसेच संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येत आहे. संबंधित मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या प्रकरणी मसाज पार्लरचा व्यवस्थापक आणि मालकाविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात येणार आहे’, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×