Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलले

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

दोघा दलालांना अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील इमारतीच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाने कारवाई केली. यावेळी पिडीत अल्पवयीन मुलीची वेश्याव्यवसायातून सुटका करून दोघा दलालांना अटक केली आहे.

पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण – सविस्तर बातमी

गुलनाज रफिक शेख (वय २५ ), इस्माईल इब्राहीम खान (वय ३२, दोघे रा. भाग्योदयनगर कोंढवा) अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिस हवालदार तुषार भिवरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक व प्रतिबंधक कायद्यासह, बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाच्या कक्षाला एका सोसायटीच्या सदनिकेत वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास छापा टाकला असता, हा प्रकार समोर आला. दोघे आरोपी दलाल पिडीत मुलीला पैशांचे आमिष आणि धाकदपटशा दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करून तिच्या वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या कमाईतून ठरावीक रक्कम स्वतःसाठी घेऊन उपजीवीका करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×