पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण

पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण

दैनिक पुढारीच्या कार्यालयाबाहेर हल्ला

marathinews24.com

पुणे – शहरातील पुढारी न्यूजमधील वार्तालापाचा कार्यक्रम संपवून बाहेर पडत असलेले राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार यांनी केला आहे.

पोलिसांचा स्पावर छापा, मॅनेजरसह मुलीने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी – सविस्तर बातमी 

दैनिक पुढारीच्या कार्यालयातील पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये सुरू असलेल्या वार्तालापात सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आले होते. वार्तालाप संपल्यानंतर सुरुवातीला दामगुडे बाहेर पडले. त्यानंतर फोनवर बोलत पवारही बाहेर येत होते. कार्यालयाबाहेर आधीच थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांना आवाज देऊन त्यांच्याशी वाद घातला. वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी पवार यांना मारहाण केली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे पवार संतापले. बचाव करण्यासाठी ते पुढारीच्या कार्यालयात सुरक्षा रक्षकांकडे धावले. दामगुडे पिस्तुलाने धमकावत असल्याचे ते मोठ्याने सांगत होते. घटनेनंतर पुढारीतील कर्मचाऱ्यांनी धाव घेत दोघांमधील वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दामगुडे हे त्यांच्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून तात्काळ निघून गेल्‍याचा प्रकार घडला. हा सर्व प्रकार दैनिक पुढारीच्‍या सीसीटिव्‍ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी अॅड. अभय छाजेड, प्रशांत जगताप आणि कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे, स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. प्रकारानंतर हनुमंत पवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तक्रार दाखल करण्यासाठी स्वारगेट पोलिस ठाण्यात गेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

“दामगुडे यांनी हा हल्ला पूर्वनियोजित केला आहे. वार्तालाप संपताच त्यांनी कार्यालयाबाहेर आधीच लोकांना बोलावून ठेवले होते. मी फोनवर बोलत बाहेर पडत असताना ‘तुला जिवंत राहायचे आहे ना? हे बघ पिस्तुल’ असे म्हणत धमकावले. आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याबाबत अपशब्द वापरत शिवीगाळ केली. त्यानंतर दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली.

– हनुमंत पवार, प्रवक्ते, राष्ट्रीय काँग्रेस

खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पवार यांनी मला यापूर्वी शिवीगाळ केली होती. शिवीगाळ केल्याने मी संतापलो होतो. मला नक्षलवाद्यांकडून धोका असल्याने मी परवानाधारक पिस्तुल बाळगतो. पवार यांनी मला नक्षलवाद्यांविरोधातील केस मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही प्रकार केला.

– तुषार दामगुडे,हिंदुत्ववादी कार्यकर्ते

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×