Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पोलिसांचा स्पावर छापा, मॅनेजरसह मुलीने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

पोलिसांचा स्पावर छापा, मॅनेजरसह मुलीने मारली दुसऱ्या मजल्यावरून उडी

उडी मारल्याने दोघेही जखमी

marathinews24.com

पुणे – पोलिसांचे पथक स्पावर छापा टाकण्यासाठी गेल्यानंतर मॅनेजरसह मुलीने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, उडी मारल्याने दोघेही जखमी झाले असून, या घटनेत मुलगी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

येरवड्यात भीषण आगीत ५० गाड्या जळल्या – सविस्तर बातमी 

हुसेन रेहमान शेख (वय ३९) असे जखमी झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. तर, २७ वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून, या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ भागात ‘द रूट’ नावाने स्पा चालविले जात होते. त्याठिकाणी काही गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानूसार विमानतळ ठाण्याचे पथक त्याठिकाणी छापा टाकण्यासाठी सोमवारी (दि.२३) सायंकाळच्या सुमारास गेले होते. पण, पोलीस आल्याची माहिती समजताच मॅनेजर हुसेन आणि मुलीने दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतूनच खाली उडी मारली. ते पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, उडी मारल्याने दोघेही जखमी झाले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. यामध्ये तरुणी गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिक तपास विमानतळ पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×