येरवड्यात भीषण आगीत ५० गाड्या जळल्या

येरवड्यात भीषण आगीत ५० गाड्या जळल्या

येरवडा परिसरातील शासकीय मोकळ्या आवारातील वाहनांना भीषण आग

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा परिसरातील शासकीय असलेल्या मोकळ्या आवारात उभा केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या आगीत तब्बल ५० गाड्या भस्मात पडल्या असून यात दुचाकींसह चारचाकी वाहनांचा समावेश आहे. दरम्यान, या गाड्या नेमक्या कोणत्या विभागाच्या आहेत हे मात्र समजू शकलेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे दाखल होत आगीवर नियत्रंण मिळविले.

पुण्यात गांजा तस्करांना अटक, २२ लाखांचा गांजा जप्त – सविस्तर बातमी 

येरवडा परिसरात मृदू, राज्य उत्पादन शुल्क तसेच वाहतूक शाखेचे कार्यालय आहे. ही जागा शासकीय असून, त्याठिकाणी चारचाकी तसेच दुचाकी पार्क केलेली होती. ही वाहने जप्त केलेली असल्याचे सांगितले जाते. पण, ती कोणत्या विभागाची आहेत, याची जबाबदारी मात्र कोणत्याही विभागाने रात्री उशिरापर्यंत घेतलेली नव्हती.

तत्पुर्वी अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, सोमवारी बुधवारी दुपारी अचानक या वाहनांना आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच तीन फायर बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. आगीत सर्वच वाहने अडकली होती. जवानांनी पाण्याचा माराकरून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. काही वेळानंतर आगीवर नियत्रंण मिळविण्यात यश आले. मात्र, या आगीत जवळपास ५० वाहने जळून खाक झाली. त्यामध्ये सर्वाधिक चारचाकी वाहनांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. ही वाहने बिनधनी म्हणून जप्त केलेली असावी, अशी शक्यता आहे. याप्रकरणाची नोंद येरवडा पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, त्यांच्याकडून याघटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×