Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पुण्यात गांजा तस्करांना अटक, २२ लाखांचा गांजा जप्त

पुण्यात गांजा तस्करांना अटक, २२ लाखांचा गांजा जप्त

लोणी काळभोरमधील गांजाचे कनेक्शन नंदुरबारपर्यंत

marathinews24.com

पुणे – शहरालगत लोणी काळभोर परिसरात अटक केलेल्या गांजा तस्करांचे कनेक्शन थेट नंदुरबारपर्यत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी विक्रीसाठी गांजा पुरवठा करणार्‍या दोघा सराईतांना गुन्हे शाखेच्या अमली विरोधी पथक एकने अटक केली आहे. आतापर्यंत याप्रकरणी चौघांना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल २२ लाखांचा ४३ किलो गांजा जप्त केला आहे. दोन मोटारी, ५ मोबाइल असा ऐवजही जप्त केला आहे. मंगेश जाण्या पावरा (वय २९ रा. भोगावडे खुर्द, धडगाव नंदुरबार ) ज्ञानेश्वर मगन पावरा (वय २५ रा. सांगवी, शिरपूर, धुळे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला अटक – सविस्तर बातमी 

लोणी काळभोर परिसरातील कदम वाक वस्तीनजीक गांजाची तस्करी करणारे अक्षय पोपटराव पाडुळे (वय ३१, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) आणि विशाल जाधव (वय २८ रा. हिंगणे मळा, हडपसर) यांना पोलिसांनी १४ फेबु्रवारीला अटक केली होती. त्यांच्याकडून ६ लाख ८८ हजारांचा ३५ किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी आरोपींविरूद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. संबंधित गुन्हा अमली पदार्थ विरोधी पथक एककडे वर्ग करण्यात आला होता. त्यानुसार पथकाने तपासाला गती दिली.

तांत्रिक विश्लेषणाद्वारे पथकाने नंदुरबार परिसरातील डोंगरदर्‍यातून सराईत गांजातस्कर आरोपी मंगेश पावरा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपासानंतर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर पावरा याला नवी सांगवी शिरपूर धुळे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ९ किलो ४२० ग्रॅम गांजा, मोटार जप्त करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त पिंगळे, एसीपी शंकर खटके, वरिष्ठ निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, नीलेश जाधव, विजय कांबळे, मंगेश गुंड, कदम, अक्षय शिर्के, शेलार यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×