दरोड्याच्या तयारीतील सराईत टोळीला अटक

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

वारजे भागात कारवाई

marathinews24.com

पुणे – दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, तलवार, तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतीक संजय हंकारे (वय १९), सूरज राणा गिरी (वय २३, रा. वडगाव शेरी), संस्कार युवराज एडके (वय १९), विशाल उत्तम वावळकर (वय २३), ऋत्विक राजू जंगम (वय १९, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस कर्मचारी निखिल तांगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी – सविस्तर बातमी 

लूटमार, दागिने हिसकाविणे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारजे भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ चोरट्यांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून हंकारे, गिरी, एडके, वावळकर, जंगम यांना पकडले. त्यांच्याकडून कोयता, तलवार, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराइत असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×