Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

पुण्यातील रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडी

१४ लाखांचे दागिने चोरीला

marathinews24.com

पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रास्ता पेठेत घडली आहे. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वैमनस्यातून अल्पवयीनावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला आणि कुटुंबीय रास्ता पेठेतील जैन हाईट्स सोसायटीत राहायला आहेत. शनिवारी (दि.२१) दुपारी साडेचारच्या सुमारास ज्येष्ठ महिला घर बंद करुन बाहेर पडल्या. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील १७ हजारांची रोकड, सोन्याचे दागिने असा १४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. रात्री आठच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक भागवत शेंडगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×