भरधाव मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

पुणे-सोलापूर रस्त्यवरील शेवाळवाडी येथे घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यवरील शेवाळवाडी येथे घडली. याप्रकरणी मांजरी पोलिसांनी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शरणप्पा अण्णपा आलूरे (वय ८०, रा. घोळसगाव, ता. अक्कलकोट, जि.. सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा नातू शिवलिंग अचलेरे (वय २३, रा. हडपसर) यांनी मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कारवाईची भीती दाखवून ३१ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरणप्पा आलूरे हे शनिवारी सायंकाळी पुणे-सोलापूर रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी शेवाळवाडी परिसातील लोटस हाॅस्पिटलसमोर पुण्याकडे निघालेल्या भरधाव मोटारीने पाठीमागून आलूरे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या आलूरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या माेटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक उमेश राेकडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×