Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कारवाईची भीती दाखवून ३१ लाखांची फसवणूक

मोबाईल हॅक करून महिलेला पावणेसहा लाखांचा गंडा

सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – काळ्या पैसे व्यवहारात बेकायदा बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, या प्रकरणात अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी लष्कर भागातील एकाची ३१ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केली. याबाबत ५१ वषीय तक्रारदाराने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे लष्कर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी सायबर चोरट्याने केली. ‘काळ्या पैसे व्यवहारात (मनी लाँड्रिग) बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक (डिजिटल ॲरेस्ट) करण्यात येणार आहे. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्याने त्यांना दाखविली. चौकशीची भीती दाखवून सायबर चोरट्याने त्यांच्याकडून वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ३१ लाख ४५ हजार रुपये घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार पवार तपास करत आहेत.

सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अशा तपास यंत्रणांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी आतापर्यंत सायबर चोरट्यांनी नागरिकांनी कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×