Breking News
टँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

सोलापूर रस्त्यावर पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील २५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले आहे. ही घटना २२ फेबु्रवारीला रात्री पावणेअकराच्या सुमारास येवलेवाडी परिसरातील शत्रुंजय मंदीर ते गंगाधाम रस्ता परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा परिसरात राहणार्‍या ४२ वर्षीय महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्टटाईम नोकरीचे आमिष, पावणेसात लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढव्यात राहायला असून, २२ फेबु्रवारीला रात्री साडेदहाच्या सुमारास शत्रुंजय मंदीर ते गंगाधाम रस्ता परिसरातून पायी जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेला गाठले. त्यांच्या गळ्यातील २५ हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय महाडिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×