Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

पार्टटाईम नोकरीचे आमिष, पावणेसात लाखांची फसवणूक

जमीन खरेदीत गुंतवणुकीच्या आमिषाने अडीच कोेटींची फसवणूक

नऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पार्टटाईम नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ६ लाख ६७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २२ ते २४ ऑक्टोबर २०२५ कालावधीत सिंहगड रोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी ३१वर्षीय तरूणाने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आणि टेलीग्रामधारकाविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पुण्यातील बुलेटराजा कारवाईच्या कचाट्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण सिंहगड रस्ता परिसरात राहायला असून, २२ ऑक्टोबर २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क केला होता. टेलीग्रॅम अ‍ॅपद्वारे संपर्क साधून त्याला एका गु्रपमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाला पार्ट टाईम जॉब देण्याची बतावणी केली. टास्क करण्याच्या माध्यमातून त्याला किरकोळ परतावा देण्यात आला. विश्वास संपादित केल्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणाकडून तब्बल ६ लाख ६७ हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×