Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

पीएमपी प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की; ५० हजारांची रोकड लुटली

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी ५० हजारांची रोकड लुटल्याची घटना विश्रांतवाडी भागात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणांच्या तत्परतेमुळे रोकड लुटीचा डाव उधळला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. ते २६ फेब्रुवारी रोजी दुपारी विश्रांतवाडी ते कोथरूड या मार्गावरील बसमधून प्रवास करत होते. बस प्रवासात चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. धक्काबुक्की करून खिशातील ५० हजारांची रोकड काढून घेतली. चोरटे शांतीनगर परिसरातील बस थांब्यावर उतरुन पसार झाले. घाबरलेल्या ज्येष्ठाने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस हवालदार भोसले तपास करत आहेत.

एसटी प्रवाशाची सोनसाखळी चोरी

एसटी प्रवाशाच्या गळ्यातील ८३ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना वाकडेवाडी एसटी स्थानकाच्या आवारात घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे मूळचे नाशिकचे आहेत. ते २८ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास वाकडेवाडी एसटी स्थानकाच्या आवारात थांबले होते. त्या वेळी चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. पोलीस कर्मचारी तागड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×