Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ५७ लाखांची फसवणूक

पुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी तिघांची ५७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. विमाननगर भागातील ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपी प्रवासी ज्येष्ठाला धक्काबुक्की; ५० हजारांची रोकड लुटली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे संजय पार्क भागात राहायला आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्यात चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी ३९ लाख सात हजार रुपये जमा केले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा देण्यात आल्याचे भासविले. मात्र, प्रत्यक्षात चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची आठ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी भागातील एकाची शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ९ लाख आठ हजार रुपयांची सायबर चोरट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×