Breking News
ब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हातपुण्यात चार घरफोड्या; ८ लाखांचा ऐवज चोरलाराज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा 

पुण्यात वीजेच्या धक्क्याने कारगिराचा मृत्यू

वीजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वीजेच्या धक्क्याने सुतारकाम करणाऱ्या कारगिराचा मृत्यू झाल्याची घटना बालेवाडीतील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या परिसरात घडली. दुर्घटनेस जबाबदार असल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. उज्ज्वल मजुमदार (वय ३२, सध्या रा. लाेटस रिएलटी, उमराणी हाॅस्पिटलसमोर, बालेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारागिराचे नाव आहे. याबाबत मजुमदारची पत्नी सरस्वती (वय २८) हिने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीतील कर्मचारी प्रवीण चंद्रकांत जवळकर, महेंद्र केशव चांडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढव्यात तरुणाचा खुनाचा प्रयत्न, ६ जणांना अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्जल मजुमदार सुतारकाम करतो. बालेवाडीतील एका नियोजित गृहप्रकल्पात तो सध्या काम करत आहे. गृहप्रकल्पाच्या आवारात तो पत्नीसह राहायला आहे. १८ मार्च रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो गृहप्रकल्पाच्या आवारात सुतारकाम करत होता. त्या वेळी अचानक पाऊस आला. प्लायवूड कापणाऱ्या कटरची वायर गोळा करत असताना विजेचा धक्का मजुमदार याला बसल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला त्वरीत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

सुतारकाम करणारा पती उज्ज्वल मजुमदार याला सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याने दुर्घटना घडल्याचे त्याच्या पत्नीने फिर्यादीत म्हटले आहे. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी पोलिसांनी ठेकेदारां विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक केकाण तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×