चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – तरुणाला मारहाण करुन त्याच्या गळ्यातील पावणेदाेन लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठाची लूट – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३४ वर्षीय तरुण हा कोथरूडमधील भारतीनगर भागात राहायला आहे. रविवारी (१० मे) दुपारी पावणेदोनच्या सुमारास तरुण मित्राला भेटण्यासाठी पौड रस्ता परिसरात गेला होता. कचरा डेपोजवळ दोघांनी त्याला अडवले. त्याला मारहाण केली. तरुणाच्या गळ्यातील पावणेदोन लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावली. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार होण्याच्या प्रयत्नात होते. तरुणाने चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. चोरटे दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले. पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.























