Breking News
आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवत संपवले आयुष्यमुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेतमोटारीची धडक देऊन महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्नपुण्यात शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ काेटीची फसवणूककटफळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा विकसित कराएमबीबीएसला अ‍ॅडमिशनचे नाव अन लुटीचा डावउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतला ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावापुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदीपुणे जिल्ह्यात अवैध दारूमाफियांवर धडक कारवाईपेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

परताव्याचे आमिष; १२ कोटी रुपयांना गंडा

परताव्याचे आमिष; १२ कोटी रुपयांना गंडा

४५ गुंतवणूकदारांची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता

maathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ४५ गुंतवणूकदारांची १२ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे . या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई टाळण्यासाठी ७० हजारांची घेतली लाच – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अरविंद राजेंद्र राजपूत (रा. बावधन, पुणे) याने ‘राजपूत वाईज इन्व्हेस्टमेंट’ या नावाने कंपनी सुरू केली होती. संबंधित कंपनी शेअर्स, स्टॉक एक्स्चेंज आणि शेअर मार्केटमधील ट्रेडिंगचे काम करत असल्याचे सांगून त्याने अनेक गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केला. २०२२ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आरोपीने गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणावर रक्कम स्वीकारली. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत त्याने पैसे उभे केले. मात्र, गुंतवलेली मूळ रक्कम आणि त्यावरील परतावा न देता विश्वासघात केला असे तक्रारीत नमूद आहे.

फसवणुकीत ४५ गुंतवणूकदारांची सुमारे १२ कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी खडक पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१६(५), ३१८(४) तसेच महाराष्ट्र ठेवीदार (वित्तीय संस्थांमधील) हितसंरक्षण अधिनियमाच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीने गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या निधीचा वापर नेमका कसा केला, तसेच फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×