Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पेरणीपूर्वी बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन

marathinews24.com

बारामती – बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाण्यांची उगवणक्षमता वाढते तसेच बुरशीजन्य व कीडजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यास मदत होते; त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी शिफारशीनुसार बियाण्यांवर बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी विभागाने केले आहे.

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक – सविस्तर बातमी

शेतकऱ्यांनी प्रमाणित व दर्जेदार बियाण्यांची निवड करून कृषी विभागाच्या शिफारशीनुसार बुरशीनाशके, कीटकनाशके तसेच जैविक घटकांचा वापर करून बीजप्रक्रिया करावी. सोयाबीन, तूर, मूग, उडीद व इतर कडधान्य पिकांसाठी रायझोबियम व पीएसबी संवर्धकांचा वापर लाभदायक ठरतो.

बीजप्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशकांची प्रक्रिया करावी. त्यानंतर आवश्यकतेनुसार जैविक संवर्धकांची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. यामुळे पिकांचे सुरुवातीच्या अवस्थेतील संरक्षण होऊन निरोगी व जोमदार उगवण मिळते.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन हाके यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×