विलास घुले हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनद्वारे आंदोलनकर्त्यांशी साधला संवाद

आ. मुंडेचे घुलेच्या न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन; खासदार पुत्र सौरभ सोनवणेला अटक होणार?

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव)बीड जिल्ह्यातील टाकळी ता. केज येथील रहिवासी विलास घुले (वय २८ वर्षे) या तरुणाची दि. २० जून रोजी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करावी या मागणीसाठी मागील तीन दिवस रास्ता रोको, आंदोलन करण्यात आले होते. दि.२३ जून मंगळवारी विलास घुले यांचा मृतदेह नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मृत विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून घुले कुटुंबीयांना न्याय द्यावा, याबाबत लेखी स्वरूपात धनंजय मुंडे यांनी निवेदन दिले.

नोकरीच्या आमिषापोटी तरुणांनी गमावले ४२ लाख रुपये – सविस्तर बातमी

दरम्यान, काल (23 जूनच्या) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि आंदोलकांना फोन करून वस्तुस्थिती जाणून घेतल्याची माहिती हाके यांनी दिली. यावेळी आंदोलकांच्या भावना त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितल्या. यानंतर रमेश घुले यांचा पुरवणी जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला. तसेच या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी उपस्थित नातेवाईकांना दिले. तर रात्री उशिरा ११ वाजता आंदोलन थांबवत दरम्यान, या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलक करत होते. त्यानुसार आता पुरवणी जबाब घेण्यात आला असून यामध्ये चौकशी करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कावँत यांनी दिली आहे. विलास घुले ता. केज या तरुणाची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली. आरोपींना अटक करा या मागणीसाठी तब्बल नऊ तास मृतदेह केज पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता. टाकळी ग्रामस्थांनी आणि नातेवाईकांकडून पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके देखील सहभागी झाले होते. हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले असून रात्री ११ वाजता घुले यांच्या मृतदेह त्याच्या गावात अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला व विलास घुले यांच्या पार्थिवावर टाकळी येथील शिवारात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आमदार धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात तीन दिवसांपूर्वी घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत स्व. विलास घुले यांच्या हत्या प्रकरणी सखोल तपास करून हत्या प्रकरणातील सर्व दोषींना अटक करून शिक्षा व्हावी, याबाबत लेखी स्वरूपात निवेदन दिले. संपूर्ण प्रकरणात सर्व बारकावे तपासून वस्तुनिष्ठ व सर्व बाजूंनी तपास केला जावा व पीडितांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती मुंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील दोषींना शासन कठोर शिक्षा करेल, असे आश्वासन मुंडेना दिले आहे. सदर हत्या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा हादरून टाकला असून, धनंजय मुंडे यांनी आज सकाळी विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला होता. त्यानंतर पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

घुले हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन

विलास घुले हत्या प्रकरणात नऊ पैकी सहा आरोपींना अटक करण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले आहे. अद्याप या प्रकरणातील तीन आरोपी फरार असून त्यांच्या शोधासाठी पोलिस प्रशासनाकडून चार पथके रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणात आता एसआयटी देखील स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे याप्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×