Breking News
टँकरच्या चाकाखाली सापडून व्यावसायिकाचा मृत्यूलाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकीटँकरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यूरॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चरचेतन चौधरीने लोहगडावरील प्रवेशशुल्क भरले नसल्याचे उघडकेतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

लाॅरेन्स बिष्णोई टोळीकडून ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकी

फुरसुंगीतील गोळीबारानंतर खंडणीचा आणखी एक प्रकार

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसरमधील फुरसुंगी भागात असलेल्या पोलाद व्यावसायिकाचे गोदाम, तसेच कार्यालयावर ५० कोटींच्या खंडणीसाठी लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील सराइतांनी गोळीबार केल्याचे घटना ताजी असतानाच बिष्णोई टोळीने ओैषध वितरकाला खंडणीसाठी धमकाविल्याचे उघडकीस आले. हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी भागात ओैषध वितरकाचे दुकान आहे.

रॅपिडो चालकाला प्रवाशांकडून बेदम मारहाण; मनगट फ्रॅक्चर – सविस्तर बातमी

बिष्णोई टोळीने ओैषध वितरकाला समाज माध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करुन धमकावल्याची माहिती पोलिसांना बुधवारी (२४ जून) मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सोमवारी (२२ जून) हडपसरमधील फुरसुंगी परिसरात पोलाद व्यावसायिकाच्या कार्यालय, तसेच गोदामावर बिष्णोई टोळीतील सराइतांनी गोळीबार केल्याची घटना उघडकीस आली. पोलाद व्यावसायिकाकडे ५० कोटींची खंडणी, तसेच गोळीबार केल्या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिष्णोई टोळीतील आरजू बिष्णोई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील आरोपी पसार झाला असून, गुन्हे शाखेकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

ही घटना ताजी असतानाच सासवड रस्त्यावरील वडकी भागात असलेल्या ओैषध वितरकाला खंडणीसाठी दूरध्वनी केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून तांत्रिक तपास करण्यात येत आहे.

फुरसुंगी गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मागावर पोलीस

फुरसुंगीतील पोलाद व्यावसायिकाच्या गोदामावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची ओळख पटलेली आहे. तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित असून, तो फुरसुंगी भागातील एका कंपनीत कामगार होता. त्याने पोलाद व्यावसायिकाची माहिती घेऊन त्याच्या व्यवसायाबाबतची माहिती बिष्णोई टोळीला पुरविल्याची माहिती तपासात मिळाली आहे. या प्रकरणाचा गुन्हे शाखा, तसेच स्थानिक पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. पोलिसांनी आरीपीला पकडण्यासाठी पथके तयार केली आहेत. १५ दिवसांपूर्वी पिंपरी चिंचवडमधील रावेत भागात असलेल्या एका फर्निचर दालनावर गोळीबार करुन बिष्णोई टोळीने खंडणीसाठी धमकावले होते. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बिष्णोई टोळीतील सराइतांना अटक केली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×