Breking News
माऊलींच्या मानाच्या अश्वांची ‘दगडूशेठ’ गणपतीला मानवंदनाकै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या वर्धापन दिनी महापौर आणि पोलिस आयुक्तांच्या हस्ते महाआरतीशुभम आव्हाळे ठरला ‘साहित्य केसरी महाकाव्य करंडक २०२६’चा विजेतामुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कतापुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसानमिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरचविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांनी सहकार्य करावेपुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीवनिम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीलाबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या आधुनिक धान्य गोदामाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना वैज्ञानिक साठवणुकीची सुविधा

मुंबई–पुणे मिसिंग लिंकवर मलबा हटविण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर कार्यरत

नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

marathinews24.com

पुणे – मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या मोठ्या दरडीमुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना आवश्यक नसल्यास मुंबई–पुणे मार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.

पूरपरिस्थितीत अडकलेल्या भाविकांची सुरक्षित सुटका; प्रशासनाचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरू – सविस्तर बातमी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, दरड कोसळलेल्या ठिकाणी सुमारे १०० टन मलबा साचला होता. विशेष म्हणजे, यापूर्वी अशा प्रकारची दरड न कोसळलेल्या भागात ही घटना घडली आहे. आतापर्यंत सुमारे ७० टन मलबा हटविण्यात यश आले असून उर्वरित मलबा हटविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

सध्या पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील तीन लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. तर मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर एकाच लेनमधून वाहतूक सुरू असून, पुढील दीड तासात आणखी मार्ग पूर्ववत करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कामाचा आढावा घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले घटनास्थळी उपस्थित असून, संबंधित विभाग, यंत्रणा आणि आपत्कालीन पथके समन्वयाने काम करत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे, वाहतूक पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसारच प्रवास करण्याचे आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×