Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

वादातून रिक्षा चालकाच्या डोक्यात कुंडी घातली

Crime News

मंगळवार पेठेतील सदानंदनगर परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – वादातून रिक्षा चालकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात कुंडी घालण्यात आल्याची घटना मंगळवार पेठेतील सदानंदनगर परिसरात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महेश भगवानसिंग परदेशी (वय ४०, रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी पुष्कर राजू काळे (वय ३०), इम्रान उर्फ सबऱ्या तौफिक शेख (वय ३२), अकिब अन्वर सय्यद (वय ३८), बिलाल अन्वर सय्यद (चौघे रा. सदानंदनगर, मंगळवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परदेशी यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसान – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परदेशी हे रिक्षाचालक आहेत. ४ जुलै रोजी त्यांनी रिक्षा सोमनाथ मित्र मंडळाजवळ लावली. रात्री साडेदहाच्या सुमारास ते गप्पा मित्रांबरोबर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी वादातून परदेशी यांना शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली. आराेपींनी त्यांच्या डोक्यात कुंडी घातली. मारहाणीत परदेशी जखमी झाले. सहायक फाैजदार संजय काळेल तपास करत आहेत.

ओैंध रस्ता परिसरात घरफोडी

पुणे- सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी चांदीच्या वस्तू चोरुन नेल्याची घटना ओैंध रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.
याबाबत एकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पिंपरी-चिंचवडमधील खराळवाडी परिसरात राहायला आहेत. त्यांचा भाऊ ओैंध रस्त्यावरील सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील चांदीचे बिस्किट, तसेच करंडा असा ऐवज चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. घरफोडीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार चक्रधर हे तपास करत आहेत.

शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात असलेल्या सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन ऐवज चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×