Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

पुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसान

३० ठिकाणी झाडे कोसळली

marathinews24.com

पुणे – शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कात्रजमधील जांभुळवाडीत एका सोसायटीतील सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. या घटनेत नऊ मोटारी, तसेच नऊ दुचाकींचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. पावसामुळे शहर परिसरात ३० ठिकाणी झाडे कोसळली
शहरात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळली.

घरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपास – सविस्तर बातमी

शहरातील वेगवेगळ्या भागात २३० ठिकाणी झाडे कोसळली. कात्रजमधील जांभुळवाडी भागात असलेल्या समृद्धी लेक सोसायटीची सीमाभिंत रविवारी पहाटे कोसळली. सीमाभिंत पार्किग शेडवर काेसळल्यानंतर नऊ मोटारी, नऊ दुचाकींचे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच कात्रज आणि सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पार्किंग शेडमधील लोखंडी गज कापण्यासाठी फॅब्रिकेशन कामगाराची मदत घेण्यात आली. ग्राईंडर, कटरचा वापर करुन पत्रे बाजूला काढण्यात आले. त्यानंतर सीमाभिंतीच्या राडारोड्याखाली अडकलेली १८ वाहने बाहेर काढण्यात आली. उपअग्निशन अधिकारी संतोष भिलारे, जवान मयूर काटे, प्रशांत कुंभार, अक्षय देवकर, शेख, सुनील दिवाडकर, राकेश बरे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार हे मदत कार्यात सहभागी झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

वाकडेवाडीत झाड कोसळून दोन वाहनांचे नुकसान

कसबा पेठेतील गावकोस मारुती मंदिर रस्ता, तसेच जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात अंडी उबवणी केंद्राजवळ झाड कोसळण्याची घटना घडली. गावकोस मारुती मंदिर रस्ता वाहतुकीस बंद झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी झाडांच्या फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करुन दिला. मुंबई-पुणे रस्त्यावर अंडी उबवणी केंद्राजवळ रविवारी दुपारी झाड कोसळले. झाडाची फांदी माेटार आणि रिक्षावर कोसळले. या घटनेत मोटारीसह रिक्षाचे नुकसान झाले. शहर परिसरात गेल्या २४ तासात ३० ठिकाणी झाडे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×