Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

घरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपास

Parvati Crime : पोलिसांकडे तक्रार देणाऱ्या तरुणाचा खुनाचा प्रयत्न

महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ज्येष्ठ महिलेच्या घरात काम करणाऱ्या महिलेने दोन लाख रुपयांच्या हिरेजडीत तीन अंगठ्या चोरुन नेल्याची घटना कोथरूड परिसात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरकाम करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६२ वर्षीय महिला कोथरूडमधील महात्मा सोसायटीत राहायला आहेत. त्यांनी गेल्या महिन्यात एका कार्यक्रमावरुन आल्यानंतर शयनगृहातील टेबलवर हिरेजडीत सोन्याच्या तीन अंगठ्या ठेवल्या होत्या. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून अंगठ्या चोरुन नेल्या. अंगठी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. घरकाम करणाऱ्या महिलेने अंगठी चोरून नेल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत.

मोटारीची काच फोडून दीड लाखांची रोकड चोरी

मोटारीची काच फोडून चोरट्यांनी दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना येरवड्यातील कल्याणीनगर भागात नुकतीच घडली. याबाबत एका व्यावसायिकाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रादार व्यावसायिक मार्केट यार्ड भागात राहायला आहेत. ते शनिवारी (४ जुलै) दुपारी दोनच्या सुमारास कामानिमित्त कल्याणीनगर भागात आले होते. लेक्सीकन स्कूलसमोरील रस्त्यावर त्यांनी मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटारीची काच फोडून पिशवीत ठेवलेली दीड लाख रुपयांची रोकड चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक किशोर बेरड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×