Breking News
बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभराज्यात २३ ठिकाणच्या दुध डेअर्‍यावर छापेमारीपुण्यात पावसामुळे सोसायटीतील सीमाभिंत कोसळून १८ वाहनांचे नुकसानघरकाम करणाऱ्या महिलेकडून २ लाखांच्या अंगठ्या लंपासपीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीलाविशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत घरभेटींची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून पाहणीबेल्हे येथे ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचे उद्या उद्घाटनएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या १११ व्या स्थापना दिनानिमित्त भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या पुतळ्याचे राज्यपालांच्या हस्ते अनावरणतळेगाव नगर परिषदेअंतर्गत संभाजीनगर येथील पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक चाचणीबाबतचा खुलासाशासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरीला

पर्वती परिसरात तरुणाला चाकूच्या धाकाने लुटले

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी महिलेच्या हातातील १ लाख १० हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शासकीय नोकरीच्या आमिषाने १५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला पिंपळे गुरव येथे राहायला आहेत. शनिवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरील पंचमी हाॅटेल चौकातील थांब्यावर त्या थांबल्या होत्या. बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन चोरुन नेली. पोलीस उपनिरीक्षक ए. ए. गायकवाड तपास करत आहेत.

हडपसर उड्डाणपूलाजवळ मोटारीच्या धडकेत एकाचा मृत्यू

हडपसर उड्डाणपुलाखाली झोपलेल्या एकाचा मोटारीच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्य एकाची ओळख पटलेली नाही. याबाबत पोलीस शिपाई अमोल राऊत यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर येथील नोबल हाॅस्पिटलसमोर असलेल्या उड्डाणपुलाखाली एक जण झोपला होता. ३ जुलै रोजी मध्यरात्री भरधाव मोटारीच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे वय अंदाजे ४० ते ४५ वर्ष असून, त्याची ओळख पटलेली नाही. तो फिरस्ता असवा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×