Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पुण्यात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, टेम्पो चालकाचा वाचवला जीव

बोपाडीतील भुयारी मार्गातील घटना

marathinews24.com

पुणे – वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे बोपोडीतील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात अडकलेल्या टेम्पो चालकाची सुटका करण्यात आली आहे. पाण्याचा प्रवाहात टेम्पो वाहून जात असलेला पाहून बंदोबस्तास असलेल्या वाहतूक पोलिसांमुळे चालकाचा प्राण वाचल्याची घटना सोमवारी (दि. ६ )दुपारी घडली. वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे आणि नितीन कारले यांच्या कामगिरीचे नागरिकांसह वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी कौतुक केले आहे.

निम्मी बोपोडी पाण्यात; उपमहापौर परशुराम वाडेकर धावले नागरिकांच्या मदतीला – सविस्तर बातमी

जु्न्या मुंबई-पुणे रस्त्यावर बोपोडीतील भाऊ पाटील रस्ता परिसरात भुयारी मार्ग आहे. पावसामुळे भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने संबंधित रस्ता सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास लोखंडी कठडे टाकून वाहतुकीस बंद केला होता. तेथे बंदोबस्तात वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी नीलेश पुकाळे आणि नितीन कारले तैनात होते. वाहतूक पोलिसांनी कठडे लावल्यानंतर भुयारी मार्गात न जाण्याच्या सूचना वाहन चालकांना दिल्या होत्या. मात्र, टेम्पोचालक राहुल पाटोळे याने पावसामुळे काचा बंंद केल्या होत्या. पोलिसांची सूचना लक्षात न आल्याने आटोळे याने भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात टेम्पो नेला. पाण्याच्या प्रवाहामुळे टेम्पो वाहून जात असल्याचे लक्षात आल्यानंतर टेम्पोचालक पाटोळेने टेम्पोची काच उघडून मदतीसाठी आरडा ओरडा केला.

बंदोबस्तास तैनात असलेले वाहतूक अमलदार नीलेश पुकाळे आणि नितीन कारले यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखून स्थानिकांच्या मदतीने दोराचा वापर करुन टेम्पो चालक पाटोळेला बाहेर काढले. त्यानंतर टेम्पो हायड्रोलिक यंत्राचा वापर पाण्यातून बाहेर काढण्यात आला. पोलिसांच्या तत्परतेमुळे टेम्पोचालकाचे प्राण वाचल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. दरम्यान, पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात पाणी साचले असून, भुयारी मार्गात पाणी जमा होत आहे. अशा परिस्थितीत साचलेल्या पाण्यात वाहन चालकांना वाहने नेण्याचा प्रयत्न करू नये. ज्या भागात लोखंडी कठडे लावले आहेत, अशा भागात जाऊ नये. नागरिकांनी पोलीस, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन वाहतूक उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×