Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

तडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघड

Pune Crime News

गावठी दारू विक्री प्रकरणातील महिलांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ अन्वये कारवाई

marathinews24.com

पुणे – गावठी दारू विक्री प्रकरणात पुणे, पिंपरी-चिंचवड शहर, जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तीन महिलांना पोलिसांनी येरवडा भागातून ताब्यात घेतले. तडीपार केल्यानंतर महिलांनी आदेशाचा भंग केल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी शारदा राजू चव्हाण (वय ४५), लक्ष्मी देवी राठोड (वय ४५), अनुसया नीलेश राठोड (वय ३२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवली – सविस्तर बातमी

चव्हाण, राठोड यांच्याविरुद्ध गावठी दारू विक्री प्रकरणी गुन्हे दाखल झाले होते. तडीपार केल्यानंतर त्या पुन्हा लक्ष्मीनगर भागात आल्या होत्या. घराजवळ त्यांचा वावर होता. गस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, पोलीस कर्मचारी प्रदीप चव्हाण, लहू गडमवाड, शाम शिपणे, रुपाली टोपे यांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर तिघींना ताब्यात घेण्यात आले. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्या प्रकरणी तिघींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अमर कदम, सहायक निरीक्षक निखील पवार, दत्तात्रय लिगाडे, महेश नलावडे, मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, श्रीनाथ कांबळे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×