३ महिला लक्ष्मीनगर पोलिसांच्या ताब्यात
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही आदेश धुडकावून शहरात परतलेल्या तीन महिलांना लक्ष्मीनगर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. शारदा राजू चव्हाण (वय ४५) लक्ष्मी देवी राठोड (वय ४५) अनुसया निलेश राठोड (वय ३२, सर्व रा. लक्ष्मीनगर पोलीस ठाणे हद्द) अशी कारवाई करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. तिघींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १४२ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी
लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे सर्व्हेलन्स पथक १३ ऑक्टोबरला परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी तडीपार आरोपींची तपासणी सुरू असताना, पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या तिन्ही महिला त्यांच्या राहत्या घराजवळच आढळून आल्या. पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या तडीपारीच्या आदेशाचा त्यांनी भंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली. Pune Crime News वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे आणि पोलीस निरीक्षक अमर कदम यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे, पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण, लहू गडमवाड, शाम शिपणे आणि रूपाली टोपे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.























