Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाई

Pune Mobile Theft Case

७० हजार रुपये किमतीचे चार चोरीचे मोबाईल जप्त

marathinews24.com

पुणे – Pune Mobile Theft Case : घराच्या टेरेसवरून मोबाईल चोरून त्यांची विक्री करण्यासाठी गिऱ्हाईक शोधणाऱ्या १९ वर्षीय चोरट्याला लक्ष्मीनगर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. शुभम संतोष केवट (वय १९, रा. रामनगर, प्रगती हॉस्पिटलसमोर, येरवडा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ७० हजार रुपये किमतीचे चार चोरीचे मोबाईल जप्त केले आहेत.

फक्त २०० रूपये न दिल्यामुळे तरुणावर वार, आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

गुन्ह्याचा तपास सुरू असताना १३ ऑक्टोबरला पोलीस अंमलदार राहुल परदेशी आणि सूरज ओंबासे यांना आरोपी शुभम केवट हा चोरीचे मोबाईल विकण्यासाठी शादलबाबा दर्ग्याजवळ गिऱ्हाईक शोधत असल्याची माहिती मिळाली. Pune Mobile Theft Case माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार आणि दत्तात्रय लिगाडे यांच्या पथकाने चामुंडामाता मंदिराजवळ सापळा रचला. हातात कॅरीबॅग घेऊन संशयास्पदरित्या थांबलेल्या शुभमला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता ४ मोबाईल आढळले.

चौकशीदरम्यान हे मोबाईल रामनगर येथील घराच्या टेरेसवरून चोरल्याची कबुली त्याने दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे आणि पोलीस निरीक्षक अमर कदम यांच्या सूचनेनुसार कारवाई केली. सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, दत्तात्रय लिगाडे, पोलीस उपनिरीक्षक महेश नलावडे यांच्यासह मयूर सूर्यवंशी, गणेश लोखंडे, श्रीनाथ कांबळे, किरण भागीत, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, अमोल गायकवाड, दत्तात्रय शिंदे, सूरज ओंबासे, अमोल वायाळ, अतुल जाधव, कादिर शेख, भीमराव कांबळे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×