Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : फक्त २०० रूपये न दिल्यामुळे तरुणावर वार, आरोपीला अटक

14 Women Sexual Exploitation Case

बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

marathinews24.com

पुणे – Pune Crime News : ओळखीतील तरुणाने २०० रुपये न दिल्याच्या रागातून त्याच्यावर हत्याराने वार केल्याची घटना १३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर राजेंद्र चावरे वय ३६ रा. गुंजोटी, अहमदपूर, लातूर याला अटक केली आहे. पुणे स्टेशन परिसरात राहणार्‍या २३ वर्षीय तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

वर्षभरापूर्वीच्या घरफोडीचा छडा; ५ आरोपी अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण आणि आरोपी ज्ञानेश्वर चावरे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. १३ ऑक्टोबरला सकाळी साडेदहाच्या सुमारास तक्रारदार हे पुणे स्टेशन परिसरात थांबले होते. त्यावेळी आरोपी ज्ञानेश्वरने त्याच्याकडे २०० रूपये मागितले. मात्र, पैेसे नसल्यामुळे त्यांनी रक्कम देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने तक्रारदारावर हत्याराने वार करून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा मदने तपास करीत आहेत.

पूजाऱ्यावर चाकूहल्ला करणार्‍याला अटक

गावाहून आणलेले सोने कोठे आहे, अशी विचारणा करीत त्यांच्यावर चाकू हल्ला करणार्‍या आरोपीला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १२ ऑक्टोबरला दुपारी पावणेबाराच्या सुमारास काळेपडळ परिसरातील संकेत विहार गल्ली क्रमांक तीनमध्ये घडली. Pune Crime News याज्ञवल्क्य उर्फ मल्लू मदनलाल तिवारी (वय २० रा. शिवनगर, काळेपडळ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अनुज राजेश पांडे (वय २६ रा. फुरसुंगी) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तिवारी हे काळेपडळ मधील शिवनगरात राहायला आहेत. ते १२ ऑक्टोबरला घरी असताना आरोपी अनुज पांडे त्याठिकाणी गेला. गावाहून आणलेले सोने कोठे ठेवले आहे, अशी विचारणा त्याने तिवारीकडे केली. त्यानंतर त्याने तिवारीच्या पाठीत चाकूने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्यांना हाताने मारहाण करीत तोंडावर मारुन दुखापत केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील तपास करीत आहेत.

घेतलेले पैसे न दिल्याने केला हल्ला, टोळक्याला अटक

चिक्की बनवण्यासाठी लागणार्‍या मशीनच्या खरेदीसाठी घेतलेले पैसे परत न दिल्याच्या रागातून टोळक्याने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना १२ ऑक्टोबरला रात्री साडेनउच्या सुमारास वाघोलीतील बकोरी रोडवर घडली आहे. याप्रकरणी टोळक्याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. किशोर पांडुरंग मोरे (वय ३० रा. अहिल्यानगर) संतोष बाबुराव वारघडे (वय ४० रा. वारघडे वस्ती, बकोरी) विशाल पिराजी आवटे (वय २८ रा. बकोरी रोड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण बकोरी गावात राहायला असून, त्यांनी आरोपींकडून पैसे घेउन चिक्की बनवण्याची मशीन घेतली होती. काही महिन्यांनी संबंधितानी तक्रारदाराला पैसे अथवा मशीन परत देण्याची मागणी केली. मात्र, काहीच न दिल्याने त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तक्रारदाराला बेदम मारहाण केली. परिसरात दहशत निर्माण करुन तक्रारदाराला गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन तपास करीत आहेत.

गोकुळनगरात घरफोडी, पावणे दोन लाखांचा ऐवज चोरीला

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ४० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना १२ ते १३ ऑक्टोबरला गोकुळनगरातील ध्रुव रेसिडेन्सी मध्ये घडली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय व्यक्तीने कोंढवा बुद्रूक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे गोकुळनगरात राहायला असून, १२ ते १३ ऑक्टोबर कालावधीत त्यांचा फ्लॅट बंद होता. त्यावेळी चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातून ४० हजारांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ८० हजारांचा ऐवज चोरुन नेला. तक्रारदार गावाहून आल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महाडिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×