Breking News
Accident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यूPune Crime News : गावठी दारू विकणाऱ्या दोन महिलांसह तिघे अटकेतPune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूक

Pune Crime News : वर्षभरापूर्वीच्या घरफोडीचा छडा; ५ आरोपी अटकेत

साडेसात लाखांचे दागिने जप्त, वानवडी पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – बंद घराच्या छतावरून गॅलरीत प्रवेश करून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मुलांची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेणार्‍या टोळीचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून ७ लाख ५० हजार रुपये किमतीचे ७५ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे.याप्रकरणी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

घरकाम करणाऱ्या महिलेने आठ लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी

धीरज ऊर्फ रंध्या रणधीर सावंत (वय २४, रा. अंजलीनगर, कात्रज) विशाल संजय लोखंडे (वय २५, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, हडपसर) नारायण वसंत काळे (वय ४८, रा. नवरत्न चौक, विजयनगर, काळेवाडी) बाळासाहेब बबनराव पाटणकर (वय ५२, रा. बी विंग, जिज्ञासा सोसायटी, धनकवडी) जितेश राजमल ओसवाल (वय ४१, रा. मार्वेâटयार्ड). अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. चोरट्यांनी छतावरून गॅलरीत प्रवेश करीत सोन्याचे दागिने, रोकड, शैक्षणिक कागदपत्रे चोरून नेली होती.

गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्यासह उपनिरीक्षक अल्फाज शेख यांनी केला. उपनिरीक्षक शशिकांत लोंढे यांच्यासह पथकाने ५ आरोपींना अटक केली. आरोपी धीरज सावंतकडून शैक्षणिक कागदपत्रे जप्त केली तर बाळासाहेब पाटणकर, जितेश ओसवाल यांच्याकडून साडेसात लाखांचे दागिने जप्त केले. ही कारवाई अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी रामदास इंगवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव, उपनिरीक्षक शेखर मोकाटे, प्रमोद टिळेकर, अमोल पिलाणे, विनोद शिवळे, सचिन घोडके, सफराज देशमुख, संदीप साळवे, निलेश वनवे, दीपक क्षीरसागर, दया शेगर, बालाजी वाघमारे, अशरद सय्यद, अभिजीत चव्हाण, चैताली यादव यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×