Breking News
मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवातमोशी इमारत दुर्घटना: प्राथमिक पाहणीनुसार संतृप्त घनकचऱ्याच्या आडव्या दाबामुळे इमारत उलटल्याचा अंदाज‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील पोलिसांना ९ हजार जीवनावश्यक वस्तूंचे किटपुण्यातून पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त मध्यरात्रीनंतर वाहतूकीत बदलपुण्यात डाॅक्टरांकडे ५० हजारांची खंडणीची मागणीविवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर‘विठू माऊली’ कार्यक्रमातून दुमदुमणार हरिनामाचा गजरपुण्यातील त्या कर्तव्यदक्ष उपनिरीक्षकाचे निलंबन मागेमोशी कचरा डेपो दुर्घटना : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी इमारतीत अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांशी साधला संवाद

पुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसान

सुदैवाने जीवितहानी टळली

marathinews24.com

पुणे – शहरताील नाना पेठेतील साखळीपीर तालमीजवळ असलेल्या जुन्या वाड्याची भिंत कोसळून ३ दुचाकींचे नुकसान झाले आहे. ही घटन सोमवारी (दि. ६) घडली असून, सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. दरम्यान, संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज जिल्ह्यातील मराठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवसभर झालेल्या पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याचे दिसून आले.

मिसिंग लिंकवरील दरड बोगद्याबाहेरच – सविस्तर बातमी

नाना पेठेत साखळीपीर तालमीजवळ जुना वाडा असून, रविवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यातच सोमवारी दुपारी जुन्या वाड्याची भिंत कोसळल्यामुळे वाड्यासमोर लावलेल्या ३ दुचाकी राडारोड्याखाली अडकल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. भिंतीखाली कोणी अडकले नाही का, याची खात्री केली. जवानांनी राडारोड्याखाली अडकलेल्या तीन दुचाकी बाहेर काढल्या. सुदैवाने घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

५१ झाडे कोसळली, रस्त्यावरील वाहतूक सुरळित

शहरासह उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मागील २० तासांत तब्बल ५१ झाडे कोसळली आहेत. सोमवारी सकाळी शहरात मुसळधार पाऊस सुरू होता. शहर, तसेच उपनगरातील विविध भागातील ५१ झाडे कोसळली. झाडे कोसळण्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी फांद्या हटवून रस्ते वाहतुकीस खुले करुन दिले. सुदैवाने झाडपडीच्या घटनेत कोणी जखमी झाले नाही. १ ते ६ जुलै कालावधीत शहर परिसरात १४७ झाडे कोसळली. पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

वडगाव शिंदे गावातील २० नागरिकांची सुटका

इंद्रायणी नदीचे पाणी चार ते पाच घरात शिरल्यामुळे १५ ते २० जण अडकल्याची घटना सोमवारी दुपारी वडगाव शिंदे गावात घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी धाव घेत बचावकार्य सुरू केले. धानोरी अग्निशमक केंद्रातील जवानांनी नागरिकांची सुटका करीत त्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×