Breking News
Dagdusheth Ganpati Temple : शेकडो दिव्यांनी उजळले ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरPune Crime News : पुण्यात गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई; गुन्हेगार जाळ्यातSatyashodhak Rally Pune : भिडे वाड्यापासून महापालिकेपर्यंत सत्यशोधक रॅली; महापालिकेत अभिरूप सभाPune Girl Attack Case : फटाक्यावर रिक्षा गेल्याने मुलीवर केला वार; आरोपीला बेड्याPune Crime News : पुण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला करणे भोवलेPune Grand Tour 2027 : शेतीमालाच्या बाजारपेठांपासून पर्यटनापर्यंत नव्या संधी; ‘पुणे ग्रँड टूर’साठी ३९ ग्रामपंचायतींनी मांडला आभाराचा ठरावSahyadri Kunbi Sangh Blood Donation Camp : सह्याद्री कुणबी संघाच्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तपिशव्यांचे संकलनमुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ४ हजार ७२६ शेतकऱ्यांची शेततळ्यासाठी निवडPune Gold Chain Theft : माधव सदाशिव पेठेत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावलेHadapsar Dog Death Case : हडपसरमध्ये मारहाणीत भटक्या श्वानाचा मृत्यू

पुण्यात अल्पवयीनासह मित्रावर शस्त्राने वार

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वादातून अल्पवयीनासह त्याच्या मित्रावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात वेदांत धानाप्पा कार्ले (वय १६, रा. वेदांत रेसीडन्सी, संत तुकारामनगगर, आंबेगाव बुद्रुक), निखील काटे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वेदांत याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफीसला बॉम्बस्फोटाची धमकी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीनांंशी वेदांतचा वाद झाला होता. बुधवारी (१५ जुलै) दुपारी पावणेतीनच्या सुमारास अल्पवयीन, निखील काटे आणि मित्र हे संत तुकारामनगर परिसरातील मोकळ्या जागेत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी वेदांत आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वेदांत आणि निखील यांना मारहाण करुन त्यांच्यावर शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेला वेदांत आणि निखील तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या अल्पवयीनांचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×