Breking News
Market Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्धPune Crime News : श्वान मालक महिलेच्या अंगावर मोटार घालून खुनाचा प्रयत्नUrban Poor Health Scheme : लोकसंवाद-२०२६’मधून महापालिकेच्या आरोग्य योजनांची जनजागृतीSadashiv Peth Dog Death : मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यूKondhwa Cash Recovery : पोलिसांच्या प्रयत्नांमुळे व्यापाऱ्याची अडीच लाखांची रोकड सापडलीSports Schemes Pune : क्रीडा विभागाच्या विविध योजनांचा युवकांनी लाभ घ्यावा; राज्यात अनेक क्रीडापटू घडवू या

पुण्यात मिशन क्रॅकडाउनचा गुंडांना तडाखा बसणार

पोलीस उपायुक्तांना संपर्क करा अन समस्या सोडवा

marathinews24.com

पुणे – पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यासह गुन्हेगारीला आळा घालण्यसाठी आता परिमंडळ सातच्या हद्दीत मिशन क्रॅकडाउन मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार संघटित गुन्हेगारीसह समाजविघातक कृत्याला आळा बसणार आहे. परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार यांनी मोहिमेची सुरूवात केली असून, स्वतःचा मोबाइल क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनो, तक्रारीसंदर्भात थेट संपर्क करा आणि समस्या सोडवा असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पुण्यात अल्पवयीनासह मित्रावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ सातच्या हद्दीत असलेल्या पोलीस ठाण्यातंर्गत मिशन क्रॅकडाउन मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यासाठी दिलेल्या मोबाइल क्रमांकावर नागरिकांना थेट पोलीस उपायुक्तांसह संबंधित वरिष्ठांकडे तक्रार करता येणार आहे. प्रामुख्याने हद्दीतील अवैध धंदे, गुन्हेगारी, समाजकंटकांविरूद्ध मोहिमेचा तडाखा देण्याचे उदिष्टे ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून, गुप्त माहितीच्या आधारे धाडी टाकणे, मोहिमेतंर्गत कारवाईचा बडगा उगारला जात आहे. त्याचा शुभारंभ १५ जुलैला लोहगाव ठाण्याच्या हद्दीत विशेष कारवायाद्वारे करण्यात आला.

लोहगावमधील हॉटेल ब्ल्यू डायमंड याठिकाणी कारवाई करून १० हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. मालक सूरज गायकवाड याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. तसेच हॉटेल राजरत्नमध्ये कारवाई करीत ११ हजार ५०० रूपयांचा मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी सुहास प्रवीण मोडक याच्यावर गुन्हा दाखल केला. परिसरात सुरू असलेल्या मटका अड्डयावर धाड टाकून १० हजार ९०० रूपयांची रोकड, दोन मोबाइल जप्त केले. या संपुर्ण कारवाईत दारूबंदी अधिनियम, जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई एपीआय गोरक्षनाथ कराड, उपनिरीक्षक नितीन राठोड, बेंद्रे, साबळे, इथापे, पुंडे, चिनके, सरतापे यांनी केली.

नागरिकांनो थेट पोलीस उपायुक्तांना करा संपर्क

अबिनाश कुमार ८८०२००७९३८, ९९२२७१७९९९, ९९२२७४४५९९

मिशन क्रॅकडाउन मोहिमेद्वारे परिमंडळातील ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेसह नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यावर आम्ही भर दिला आहे. त्यासोबतच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे, गुन्हेगारीला आडकाठी निर्माण करण्यासाठी प्राधान्य दिले आहे.

-अबिनाश कुमार, पोलीस उपायुक्त, परिमंडळ सात

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×