Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यात अल्पवयीनासह मित्रावर शस्त्राने वार

खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – वादातून अल्पवयीनासह त्याच्या मित्रावर शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव परिसरात बुधवारी घडली. या प्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात वेदांत धानाप्पा कार्ले (वय १६, रा. वेदांत रेसीडन्सी, संत तुकारामनगगर, आंबेगाव बुद्रुक), निखील काटे हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत वेदांत याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तीन अल्पवयीनांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात पासपोर्ट कार्यालयासह पोस्ट ऑफीसला बॉम्बस्फोटाची धमकी – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीनांंशी वेदांतचा वाद झाला होता. बुधवारी (१५ जुलै) दुपारी पावणेतीनच्या सुमारास अल्पवयीन, निखील काटे आणि मित्र हे संत तुकारामनगर परिसरातील मोकळ्या जागेत गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी अल्पवयीन आरोपी तेथे आले. त्यांनी वेदांत आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वेदांत आणि निखील यांना मारहाण करुन त्यांच्यावर शस्त्राने वार करुन आरोपी पसार झाले. गंभीर जखमी झालेला वेदांत आणि निखील तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या अल्पवयीनांचा शोध घेण्यात येत असून, सहायक निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×