Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

मदतीचा बहाणा करुन चाेरट्यांचा डल्ला

 marathinews24.com

पुणे – एटीएममधून रोकड काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाकडे मदतीचा बहाणा करुन चाेरट्यांनी एक लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना खडकी बाजार परिसरात घडली.

अनैतिक संबंधांना विरोध केल्याने बेदम मारहाण तरुणाचा खून –  सविस्तर बातमी

याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक बोपोडी भागात राहायला आहेत. ते शुक्रवारी (९ मे) खडकी बाजार परिसरात कामानिमित्त आले होते. खडकी बाजारातील एका बँकेच्या एटीएममध्ये ते पैसे काढण्यासाठी गेले. एटीएमच्या बाहेर २० ते २५ वर्षांचा चोरटा पाळत ठेऊन थांबला होता. ज्येष्ठाच्या पाठोपाठ चोरटा एटीएममध्ये शिरला. ज्येष्ठाने एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पैसे बाहेर पडले नाहीत. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना मदत करण्याचा बहाणा केला. पैसे काढून देतो, असे सांगून त्यांच्याकडून एटीएम कार्ड, तसेच सांकेतिक शब्द (पासवर्ड) घेतला.

चोरट्याने पैसे काढण्यासाठी दुसरे एटीएम कार्ड वापरले. पैसे बाहेर पडले नाहीत. एटीएममध्ये तांत्रिक बिघाड असल्याची बतावणी चोरट्याने केली. चोरट्याने त्याच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठाला दिले. चोरट्याकडे ज्येष्ठाचे एटीएम कार्ड होते. एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून एक लाख रुपयांची रोकड चोरली. खात्यातून पैसे चोरीला गेल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे तपास करत आहेत.

एटीएममधून पैसे काढणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. मध्यंतरी वारजे पोलिसांनी एटीएमधून पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या उत्तर प्रदेशातील चोरट्यांना पकडले होते. चोरटे एटीएमच्या परिसरात पाळत ठेवतात. ज्या भागातून पैसे बाहेर येतात (कॅश डिस्पेन्स) तेथे लोखंडी पट्टी लावतात. पैसे बाहेर न पडल्याने ज्येष्ठ नागरिक गोंधळात पडतात. त्यानंतर चोरटे ज्येष्ठांकडे मदतीचा बहाणा करतात. त्यांच्याकडील एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्द घेतात. चोरेट त्यांच्याकडील एटीएम कार्ड ज्येष्ठांना देतात. एटीएम कार्ड आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करुन चोरटे रोकड चोरुन नेतात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×