Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Police Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरव

Police Duty Meet

आयटी, अँटी सबोटेज चेक अन फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांना पदके

marathinews24.com

पुणे – Police Duty Meet : एकवीसव्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गुरुवारी (दि. ८) सुवर्ण, रजत आणि कास्य पदके देऊन गौरव करण्यात आला. गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) वतीने राज्य राखीव पोलीस बलाच्या (एसआरपीएफ) गट क्रमांक २ च्या मैदानावर हा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. दि. ५ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या कर्तव्य मेळाव्यात विविध कौशल्यांवर आधारित स्पर्धा घेण्यात येत आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

आयटी प्रोफिशियन्सी (संगणक व माहिती तंत्रज्ञानातील प्रावीण्य) स्पर्धेत पुणे बिनतारी संदेश विभागातील सहाय्यक पोलीस फौजदार अमोल कोकरे यांनी सुवर्णपदक पटकावले. Police Duty Meet नांदेड परिक्षेत्रातील पोलीस हवालदार राजेश कंचे यांनी रजत, तर मिरा-भाईंदर, वसई-विरार येथील सहाय्यक पोलीस फौजदार संदीप राणे यांनी कास्यपदक मिळविले. अँटी सबोटेज चेक ( घातपातविरोधी सुरक्षा तपासणी /ग्राउंड सर्च) स्पर्धेत महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनीचे पोलीस नाईक आशिष बाळकृष्ण पाटील यांनी सुवर्णपदक मिळविले.

याच प्रबोधिनीचे पोलीस नाईक सतिश बाळकृष्ण गायकवाड यांनी रजत, तर गडचिरोली परिक्षेत्रातील पोलीस हवालदार पंकज हुळके यांनी कास्यपदक पटकावले. पोलीस फोटोग्राफी स्पर्धेत कोकण परिक्षेत्रातील पोलीस हवालदार ए. ए. गमरे यांनी सुवर्णपदक मिळविले. दहशतवाद विरोधी पथकातील (एटीएस) पोलीस शिपाई तुलशीदास पहारे यांनी रजत, तर ठाणे शहरातील पोलीस शिपाई सचिन सोपान चव्हाण यांनी कास्यपदक मिळविले. विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पदके प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलिस उपअधीक्षक जयश्री चिवडशेट्टी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×