Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Drought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हे

Drought Relief Udgir

दुष्काळग्रस्त भागात पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल व्यक्त केला खेद

marathinews24.com

उदगीर – Drought Relief Udgir : चाऱ्याची आवश्यकता असलेल्या गावांची तातडीने पाहणी करून गरजू शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी गावातच सोमवार ( दि. १२) ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना विधान परिषद सदस्या तथा माजी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रशासनाला दिल्या. दुष्काळी उपाय योजनांबाबत २५ सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित झाला असतानाही गंभीर दुष्काळग्रस्त भागात आवश्यक पाहणी झालेली दिसत नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.

पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली – सविस्तर बातमी 

मराठवाडा दौऱ्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी उदगीर तालुक्यातील करडखेल आणि दिग्रज येथील शेतांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नांचा आढावा घेतला. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कैलास माने यांच्या शेतात जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली व शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, संपर्कप्रमुख रंजना कुलकर्णी, संगीता चव्हाण, सुनीता मोरे, जिल्हाप्रमुख चंद्रकांत टेंगेटोळ, सरपंच पांडुरंग ढगे, शेतकरी बापुराव माने, श्रीकांत कोंबले, विकास सोसायटीचे चेअरमन कुमार पाटील, बालाजी पडोळे, रोगनाथ गंगाराम ढगे उपस्थित होते.

शासनाने निर्णय घेतल्यानंतर त्याचा लाभ प्रत्यक्ष गावापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. शेतकरी चारा उपलब्ध नसल्याची व्यथा सातत्याने मांडत असताना प्रशासनाने गावनिहाय पाहणी करून जनावरांची संख्या आणि चाऱ्याच्या गरजेची माहिती यापूर्वीच संकलित करायला हवी होती, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. तलाठी, सरपंच आणि संबंधित यंत्रणांनी जनावरांची व त्यांच्या मालकांची यादी तातडीने तयार करून खातरजमा करावी. (Drought Relief Udgir) त्या आधारे चारा पुरवठ्याचे नियोजन करून सोमवारपर्यंत गावात चारा पोहोचवावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ग्रामस्थांनी सुमारे दोन हजार जनावरांसाठी चाऱ्याची गरज मांडली असून, याबाबत जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकरी व शेतमजुरांना भरीव मदत द्या-सुधाकर भालेराव

माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी पिकांवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे सांगितले. विहिरी व बोअरवेलचे पाणी आटत असून, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत, कर्जमाफी, वीजबिलात दिलासा आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, अशी मागणी भालेराव यांनी केली. भूमिहीन शेतमजुरांसाठीही आर्थिक सहाय्य व रोजगाराची व्यवस्था करावी. प्रशासकीय प्रक्रियेमुळे मदतीला विलंब होऊ न देता तातडीने उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक टँकरची व्यवस्था, पीककर्जाचे पुनर्गठन, शेतीशी संबंधित कर्जवसुलीला स्थगिती आणि शासन निर्णयातील सवलतींच्या अंमलबजावणीसाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. रोजगार हमीअंतर्गत कामे सुरू करून शेतमजुरांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा आणि स्थलांतर टाळता यावे, यावर त्यांनी भर दिला. पाणीपुरवठ्याच्या पात्र कामांसाठी आमदार निधीतून ₹२५ लाखांपर्यंत मदत करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. चाऱ्याच्या व्यवस्थेसाठी आमदार निधी वापरण्याची परवानगी मिळू शकते का, याची तपासणी करून शासनाकडे मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक संस्था व सीएसआर निधीच्या माध्यमातून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींच्या आरोग्य व पोषणाच्या गरजांकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. दुष्काळाचा प्रश्न राजकारणापलीकडचा आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे,” असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×