Breking News
Ravi Paranjape Art : सर्जनशीलता हीच खऱ्या कलाकाराची ओळख-स्मिता रवी परांजपेPune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरुPolice Duty Meet : पोलिस कर्तव्य मेळाव्यात विजेत्यांचा गौरवDrought Relief Udgir : चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हेMPSC Student Protest : पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीGlow Garden Lonavala : लोणावळ्यात वेट‘एन जॉयमध्ये ‘ग्लो गार्डन सुरुCSR Social Impact : सीएसआर गुंतवणुकीचा सामाजिक परिणाम मोजणे आवश्यकBaramati Crop Panchnama : बारामती तालुक्यात खरीप पिकांच्या पंचनाम्याला सुरुवातMiyawaki Forest Alandi : सेवा संकल्प अभियान अंतर्गत आळंदी येथे मियावाकी पद्धतीने ५ हजार रोपांचे वृक्षारोपणAWTIS 2026 : विकसित भारतासाठी युवा पिढीची बुद्धी, नवकल्पना महत्वपूर्ण- केंद्रीय राज्यमंत्री सतीशचंद्र दुबे

Pune Crop Panchnama : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरु

दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ८ तालुक्यांत खरीप पिकांचे पंचनामे सुरु

३३,९७६ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण

marathinews24.com

पुणे – Pune Crop Panchnama : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

चाऱ्याची गरज असलेल्या गावांची पाहणी करा; ऑक्टोबरपर्यंत चारा उपलब्ध करून द्या- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. Pune Crop Panchnama  या तालुक्यांमध्ये एकूण १,१०२ गावांतील ८ लाख २८ हजार ४२८ खातेदार पंचनाम्याच्या कार्यवाहीत समाविष्ट झाले आहेत. एकूण ३ लाख ३२ हजार ५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.

पंचनाम्यानुसार ३३,९७६.५६ हेक्टर क्षेत्रावरील ६४ हजार ८७५ खातेदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर १२८९.७०, वेल्हा ८०८, शिरूर ७७५.०९, बारामती १९४८, पुरंदर १०,७२९, इंदापूर ६,६८७.६१, खेड ६,२८० आणि दौंडमध्ये ५,४५९.१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.

दुष्काळ लागू झालेल्या तालुक्यांतील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे अद्यापपर्यंत झालेले नाहीत, त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी किंवा सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पिकांचे पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, जेणेकरून कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×