पुण्यातील बाणेरमध्ये लूटमार करणारे चौघे अटकेत; अल्पवयीनही ताब्यात
marathinews24.com
पुणे – Baner Robbery Case Pune ; शहरातील बाणेर परिसरात एकाला धमकावून त्याच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी, तसेच रोकड असा ऐवज लुटणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. पवन रामदास पारगे (वय १८, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता), साहिल बाळासाहेब मरगळे (वय १९, रा. कोल्हेवाडी, खडकवासला, सिंहगड रस्ता), विशाल बाळासाहेब झोडगे (वय १८, रा. कदम वाडा, धायरी गाव), आदित्य हरिश्चंद्र कोळकर (वय १८, रा. शिंदे चाळ, गारमाळ, धायरी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्त – सविस्तर बातमी
बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्याने १ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री तक्रारदार निघाले होते. त्या वेळी आरोपींनी त्यांना अडवले. त्यांना धमकावून हातातील सोन्याचे ब्रेसलेट, सोनसाखळी काढून घेतली. त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार ९९९ रुपये घेतले. (Baner Robbery Case Pune) आरोपी दुचाकीवरुन पसार झाले. पादचाऱ्याने याबाबत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. लूटमार करणारे चोरटे धायरी भागातील असल्याची माहिती तपासात मिळाली.
पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या प्रकरणात चौघांसह एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनीकांत, सहायक आयुक्त ब्रह्मदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खिल्लारे, सहायक निरीक्षक गणेश रायकर, गणेश गायकवाड, बाबा आहेर, किसन शिंगे, संदेश निकाळजे, संजय दहिभाते, शरद राऊत, अतुल इंगळे यांनी ही कारवाई केली.




















