Breking News
Dr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्णChandrakant Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात प्रचारPune Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेशPune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदलBaner Robbery Case Pune : बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआडPune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्तPune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेशPune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूक

Pune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल

Pune Traffic Changes : पुण्यात नवरात्रौत्सवानिमित्त वाहतूक बदल

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते बदल

marathinews24.com

पुणे – स्वारगेट ते कात्रज दरम्यान भूमिगत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून मार्केट यार्ड परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये तात्पुरते स्वरूपात बदल करण्यात आले आहेत.

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेश – सविस्तर बातमी

अपर बिबवेवाडी कडून चंद्रलोक चौक मार्गे पुष्पमंगल चौकात येणाऱ्या वाहनांना स्वारगेट, मार्केटयार्ड, उत्सव हॉटेलकडे उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील वाहनांनी डावीकडे वळून तनिष्क शोरूम समोरून अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन स्वारगेट कडे जावे.

स्वारगेट कडून पुणे सातारा रोडने तसेच मार्केट यार्ड कडून सातारा, कात्रज, बिबेवाडी कडे जाणारी वाहतूक ही वेलनेस मेडिकल स्टोअर तसेच भापकर पेट्रोल पंपाच्या बाजूने पुष्पमंगल चौकातून कात्रज अपर बिबवेवाडी मार्गे वळविण्यात आली आहे. पुष्पमंगल चौकाकडून मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात आली आहे.

मार्केटयार्ड, उत्सव हॉटेल चौक येथून स्वारगेट कडे जाणाऱ्या वाहनांना उजवीकडे वळण्यास बंदी करण्यात येत आहे. मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांनी वखार महामंडळ चौक येथून इच्छित स्थळी जावे. अथवा पुष्पमंगल चौक तनिष्क शोरूम, अरणेश्वर बस स्टॉप येथून यू टर्न घेऊन किंवा वखार महामंडळ चौकातून इच्छित स्थळी जावे,अशी माहिती वाहतूक शाखेने कळविली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×