Breking News
Dr. Neelam Gorhe : दुष्काळाचे संकट टळावे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या-डॉ. नीलम गोऱ्हेPune Drought News : दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८ तालुक्यांतील ८५ टक्के पिकांचे पंचनामे पूर्णChandrakant Patil : पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघांसाठी चंद्रकांतदादांचा पुण्यात प्रचारPune Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेशPune Metro Traffic Changes : स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदलBaner Robbery Case Pune : बाणेर परिसरात लूटमार करणारे गजाआडPune Illegal Pistol Seizure: सिंहगड रस्ता पोलिसांकडून सराइतांना बेड्या; पिस्तूल जप्तPune Lokmanya Festival : पुणे लोकमान्य फेस्टिवलच्यावतीने ३० फुटांच्या रावणाच्या प्रतिकृतीचे दहन; अनिष्ट प्रवृत्तींच्या अंताचा संदेशPune Bibwewadi Robbery Case : तरुणाला मारहाण करुन लुटणारे गजाआडPune Senior Citizen Pension Fraud : ज्येष्ठ महिलेची ७ लाखांची फसवणूक

Pune Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २३ ऑक्टोबरला आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश

MLC Election 2026

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रमांतर्गत शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पडावी, तसेच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी पुणे जिल्ह्यातील संबंधित गावांमध्ये आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

स्वारगेट ते कात्रज भूमिगत मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी वाहतुकीत बदल – सविस्तर बातमी

पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र निश्चित केलेल्या गावांतील आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत.

ज्या गावांमध्ये आठवडे बाजार बंद राहणार आहेत, त्यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मौजे पारगाव तर्फे असवसरी बुद्रुक व घेडेगाव, इंदापूर तालुक्यातील मौजे बावडा, खेड तालुक्यातील मौजे राजगुरुनगर आणि बारामती तालुक्यातील मौजे लोणीभापकर या गावांचा समावेश आहे.

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित गावांतील व्यापारी, बाजार समित्या, ग्रामपंचायती आणि नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×