Breking News
Pune Girl Child Birth Ratio : ‘मुलींच्या जन्माचे स्वागत घरातूनच व्हावे’; आईसोबत वडील आणि कुटुंबाचेही समुपदेशन करा-डॉ. नीलम गोऱ्हेRapido Bike Taxi Pune : पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर टाळा; पुणे आरटीओचे नागरिकांना आवाहनMaharashtra Revenue Department : महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानPune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यातSwargate Bus Theft Case : एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुटPune Police Farmer Aid : खाकीचा बळीराजाला आधार; पुणे पोलीस देणार ३ कोटी रुपयेEach Woman Champion Maharashtra : महाराष्ट्रातील ३५ हजार महिला उद्योजिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्टSadashiv Peth ATM Theft : सदाशिव पेठेत एटीएमची तोडफोड करुन रोकड चोरीचा प्रयत्नPune Crime News : पुण्यातील रास्ता पेठ, लोणी काळभाेर भागात घरफोडीPune Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारा गुंड तडीपार

Pune Crime Branch Arrest : रेकॉर्डवरील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Pune Crime Branch Arrest

समर्थ पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

marathinews24.com

पुणे – Pune Crime Branch Arrest : फरार आणि तडीपार म्हणून नोंद असतानाही काही आरोपी शहरातच बिनधास्त वावरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. रेकॉर्डवरील पाहिजे आरोपींची तपासणी सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. रिझवान खलील शेख (वय २४, रा. जनता पॅलेस, कसबा पेठ, कागदीपुरा, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. समर्थ पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०२५ मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १८९(२), १९०, ३५२ आणि ३५१(२) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी म्हणून नोंद होता.

एसटी प्रवासात गुंगीकारक गोळ्या खाण्यास देउन प्रवाशांची लुट – सविस्तर बातमी 

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे, फरार, तडीपार तसेच मोक्का गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार प्रदीप राठोड यांना गोपनीय बातमीदारामार्फत रिझवान शेख हा चूडामण तालीम चौक परिसरातील कॅफे न्यू डे आणि पद्मजी पार्कजवळ असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचून सकाळी अकराच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. (Pune Crime Branch Arrest) चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला समर्थ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक अंजुमन बागवान यांच्या नेतृत्वाखाली पथकातील प्रदीप राठोड, रवींद्र लोखंडे, अजित शिंदे, साधना पवार आणि नारायण बनकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×