Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Pune Guruwar Peth Fire News : पुण्यात गुरुवार पेठेत फटाक्यामुळे वाड्याला आग

 Pune Guruwar Peth Fire News

पंचहौद मिशनजवळील भंडारी वाड्यातील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Guruwar Peth Fire News : फटाक्यामुळे जुन्या वाड्याला आग लागल्याची घटना गुरुवार पेठेत मंगळवारी रात्री घडली. वाडा मोडकळीस आल्याने तेथे कोणी राहत नव्हते. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. गुरुवार पेठेतील पंचहौद मिशनजवळ भंडारी वाडा आहे. हा वाडा मोडकळीस आला असून, तेथे कोणी वास्तव्यास नाही. मंगळवारी (१० नोव्हेंबर ) रात्री साडेदहाच्या सुमारास वाड्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला दिली.

कौटुंबिक वादातून तरुणाचा खून – सविस्तर बातमी 

आगीच्या घटनेची माहिती अग्निशामन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. वाडा धोकादायक झाल्याने याबाबतची माहिती महापालिकेच्या घरपडी विभागाला देण्यात आली. अरुंद गल्लीत दाट वस्तीत वाडा आहे. संभाव्य दुर्घटना विचारात घेऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तातडीने वीजपुरवठा खंडीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जुन्या वाड्यात पेटता फटका पडल्याने आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशामन दलाचे अधिकारी संजय रामटेके, प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० जवानांनी पाण्याचा मारा करुन अर्धा तासात आग आटाेक्यात आणली.

वाडा कोसळण्याची शक्यता असल्याने याबाबत माहिती वाड्याच्या मालकांना देण्यात आली. (Pune Guruwar Peth Fire News) वाड्यात कोणी राहत असल्याची माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी पाचनंतर शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आली. रविवारी (८ नाेव्हेंबर) दुपारी तीन ते सोमवारी (९ नाेव्हेंबर) सकाळी सातपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत ९४ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×