Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Rabi Crop Insurance 2026-27 : रब्बी हंगामातील सात पिकांसाठी पीक विमा नोंदणी सुरू; शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे

Rabi Crop Insurance 2026-27

ज्वारीसाठी ३० नोव्हेंबर, तर गहू, हरभरा व कांद्यासाठी १५ डिसेंबर अंतिम मुदत; ११ दिवसांत ५९९ अर्जांद्वारे ३९२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

marathinews24.com

पुणे – Rabi Crop Insurance 2026-27 : नैसर्गिक आपत्ती, दुष्काळसदृश्य परिस्थिती, कीड व रोगांमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात या योजनेंतर्गत गहू, ज्वारी, मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग, हरभरा आणि कांदा या सात पिकांसाठी विमा नोंदणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी विहित मुदतीत आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

दुष्काळी दौऱ्यात भाऊबीजेचा स्नेहबंध; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सोनकरवस्तीवर शेतकरी कुटुंबासोबत केला फराळ – सविस्तर बातमी 

निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेती उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी पीक विमा महत्त्वपूर्ण ठरतो. विमा संरक्षित पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास नियमानुसार नुकसानभरपाई देण्यात येते. त्यामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

रब्बी हंगामात ज्वारी पिकासाठी विमा नोंदणीची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२६ आहे. तर गहू, हरभरा व कांदा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६ आणि उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत विमा नोंदणी करता येणार आहे.

कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागाची संधी

Rabi Crop Insurance 2026-27 या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार आहे. शेतात प्रत्यक्ष पेरणी केलेल्या पिकाचाच विमा उतरविणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास त्यांनी संबंधित बँकेत विमा हप्ता कपात न करण्याबाबत अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी लेखी घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे.

पीक विमा नोंदणीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) पोर्टल, क्रॉप इन्शुरन्स ॲप, जवळची बँक, सीएससी केंद्र किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे संपर्क साधता येईल.

११ दिवसांत ५९९ अर्ज; ३९२ हेक्टर क्षेत्र संरक्षित

पुणे जिल्ह्यात २ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पीक विमा योजनेसाठी ५९९ अर्ज प्राप्त झाले असून, त्याद्वारे ३९२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक कांदा पिकाचा विमा उतरविला आहे. त्याखालोखाल ज्वारी, हरभरा, मका आणि गहू या पिकांसाठी विमा नोंदणी करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादनात घट झाल्यास आर्थिक नुकसानभरपाई मिळण्यासाठी पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×