Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Beed Road Accident Rescue : रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणासाठी डॉ. थोरात दांपत्य देवदूतासारखे धावले

Beed Road Accident Rescue

वाहनातून नेत रस्त्यातच केले उपचार; सर्वत्र कौतुक

marathinews24.com 

बीड (अनंत जाधव) – Beed Road Accident Rescue : माणुसकी, संवेदना आणि सेवाभाव या गोष्टी केवळ भाषणात किंवा कागदावर शोभत नाहीत, तर त्या ऐन प्रसंगी कृतीतून सिद्ध कराव्या लागतात, याचे सुंदर उदाहरण बीडमध्ये पाहायला मिळाले आहे. कार्यक्रमासाठी जाताना बाळा घाटाच्या उतरणीवर झालेल्या भीषण अपघातात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी तरुणाला वाचवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संचालक डॉ. अशोक थोरात आणि डॉ. प्रतिभा थोरात हे डॉक्टर दांपत्य देवदूतासारखे धावले. रक्ताने माखलेल्या शेरवानीतच त्यांनी रुग्णावर उपचार करत मानवतेचे अनोखे दर्शन घडवले.

मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणे – सविस्तर बातमी 

डॉ. अशोक थोरात आणि डॉ. प्रतिभा थोरात हे दांपत्य प्रवासात असताना बाळाघाटाच्या उतरणीवर मावळतीच्या सुमारास त्यांच्या डोळ्यांसमोरच हा अपघात घडला. रस्त्यावर एक व्यक्ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. (Beed Road Accident Rescue) अपघाताची ही भीषण अवस्था पाहताच क्षणाचाही विलंब न करता या डॉक्टर दांपत्याने आपली गाडी थांबवली आणि मदतीसाठी धाव घेतली. जखमी व्यक्तीला तातडीने उपचारासाठी बीड जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेत त्यांनी स्वतःच्या वाहनातून रुग्णालयात आणले.

उपचारासाठी डॉ. अशोक थोरात यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या अंगातील सुंदर शेरवानी उपचारादरम्यान पूर्णपणे रक्ताने माखली होती. मात्र, पदाची किंवा कपड्यांची कोणतीही तमा न बाळगता त्यांनी जखमीच्या चिरलेल्या जखमेवर स्वतः पुढे होऊन टाके घातले. एक डॉक्टर म्हणून असलेले कर्तव्य आणि माणूस म्हणून असलेली अफाट संवेदना त्यांच्या या कृतीतून पाहायला मिळाली आहे . याचवेळी डॉ. प्रतिभा थोरात यांनीही जखमी तरुणाच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवत त्याला धीर दिला.

ओळखीच्या व्यक्तीला आपल्यापणाची जाणीव करून दिली. या संपूर्ण घटनेने पुन्हा एकदा हे सिद्ध केले की, माणसाच्या संकटात धावून जाण्यासाठी मोठ्या पदाची गरज नसते, तर त्यासाठी मोठे मन असावे लागते. रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या व्यक्तीची जात किंवा धर्म न बघता केवळ तिचा जीव वाचवणे हाच खरा मानवी धर्म असतो, हा संदेश या डॉक्टर दांपत्याने आपल्या कृतीतून दाखवून दिला आहे. डॉ. अशोक थोरात आणि डॉ. प्रतिभा थोरात यांच्या या थक्क करणाऱ्या व उदात्त मानवी कार्याच्या चर्चेला आता संपूर्ण बीड जिल्हात उधाण आले आहे . डॉ थोरात दापंत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×